शेतकऱ्यांसाठी सरकारच्या टॉप 8 बेवसाईट्स नवी दिल्ली : शेतकऱ्यांना परिस्थितीचा सामना करता यावा तसेच सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या घालाव्या लागू नयेत म्हणून सरकारने अनेक वेबसाईट आणि पोर्टल्स उपलब्ध करुन दिलेले आहेत. ज्याद्वारे शेतकऱ्यांना अनेक हिताच्या योजनांची घरबसल्या माहिती घेता येऊ शकते. शिवाय कृषी विभागाचे मार्गदर्शनही मिळवता येऊ शकते.   

 1. माती मातीचं आरोग्य तपासून पीक घेण्यासाठी शासनाकडून सॉईल हेल्थ कार्ड ही योजना सुरु करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी कार्ड मिळवण्यासाठी जवळच्या सेतू किंवा इंटरनेट सुविधा उपलब्ध असेल अशा ठिकाणी जाऊन www.soilhealth.dac.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. त्यानंतर या पोर्टलमध्ये आपले स्वतःचे खाते तयार करावे लागते. या कार्डअंतर्गत त्या भागातील प्रयोगशाळेत मातीचे आरोग्य तपासले जाते. त्यावरुन संबंधित शेतातील मातीत कोणते पीक चांगले येऊ शकेल, त्याला पोषक औषधे आणि त्यांचे प्रमाण कसे असावे, याची माहिती मिळवता येते. या सुविधेमुळे शेतकरी आपल्या शेतीला पोषक असे पिक घेऊ शकतात. या संकेतस्थळावर मराठी भाषेसह एकूण 22 भाषांचा पर्याय उपलब्ध आहे.  

 2. शेतकरी पोर्टल  www.farmer.gov.in या संकेतस्थळावर गेल्यानंतर त्यांचे गाव, गट, जिल्हा किंवा तालुका निवडावा लागतो. त्यानंतर आवश्यक त्या पीकासंबंधित माहिती किंवा किटकनाशके, पीककर्ज यांबाबत सर्व विस्तृत माहिती या वेबसाईटवर मिळते. ही माहिती आपल्याला समजणाऱ्या भाषेतील मजकूर, एसएमएस, ई-मेल किंवा ऑडिओ किंवा व्हिडीओ अशा स्वरुपात दिली जाते. गृहपृष्ठावर देण्यात आलेल्या भारताच्या नकाशाद्वारे सहजपणे या पातळ्यांवर जाता येते. शेतकऱ्यांना विशिष्ट प्रश्न विचारता येतील तसेच प्रतिक्रियाही देता येते.   

3. मेरा किसान पोर्टल  पोर्टल म्हणून परिचित आहे. www.mkisan.gov.in या वेबसाईटवर शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत विविध प्रकारची माहिती मिळवता येते. त्यासाठी अगोदर या संकेतस्थळाचा सदस्य होणं आवश्यक आहे. त्यानंतर शेतकरी थेट अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकतात. तसेच मोबाईल सेवेद्वारे एसएमएसद्वारेही माहिती मिळवू शकतात. हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्हीही भाषांचा पर्याय या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.  

 4. पंतप्रधान पीक विमा योजना  कवच असावे यासाठी सरकारने ही योजना सुरु केली. या योजनेतर्गत प्रत्येक पिकावर विमा पद्धत उपलब्ध आहे. www.agri-insurance.gov.in या वेबसाईटवर मेंबर होणं गरजेचे आहे. त्यानंतर विम्यासाठी ऑनलाईन अर्जही करता येतो. स्वत:शी संबंधित सर्व माहिती भरल्यानंतर हिंदी भाषेत पुढील पर्याय उपलब्ध आहेत.  

 5. पंतप्रधान कृषी शेतकरी पावसावर अवलंबून असतो. मात्र हे अवलंबित्व कमी करुन प्रत्येक शेतात पाणी पोहचवण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली. शेतात पाणी साठवणे, सिंचन आणि जलसंधारणाचे विविध पर्याय www.pmksy.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. सोबतच शासनाच्या या उपक्रमांतर्गत येणाऱ्या सर्व योजनांची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.  

 6. राष्ट्रीय शेती बाजार  आवडत्या बाजारात विकता यावा किंवा ग्राहकांना कोणत्या मालाचा बाजारबाव काय आहे याची घरबसल्या माहिती घेता यावी या उद्देशाने राष्ट्रीय शेती बाजार या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. agmarknet.dac.gov.in या संकेतस्थळावर जाऊन शेती मालाचा सध्याचा बाजारभाव तसेच ग्राहकांनाही ऑनलाईन बाजारभाव पाहता यावा याविषयीचे पर्याय उपलब्ध आहेत. पीक निवडून राज्य, जिल्हा, तालुका आणि जवळची बाजारपेठ निवडणे असे पर्याय या संकेतस्थळावर आहेत. 

 7. ई-राष्ट्रीय शेती बाजार योजनेप्रमाणेच शेतीमाल विक्री किंवा बाजारात शेतीमाल येण्याची वेळ, बाजारभाव आणि खरेदी विक्री यांची माहिती www.enam.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. सध्या या संकेतस्थळावर देशभरातील काही मुख्य बाजारपेठांचा समावेश केला आहे. त्या बाजारपेठेमध्ये सध्या कोणत्या शेतीमालाला काय बाजारभाव मिळत आहे, हे पाहता येते. सोबतच ग्राहकांना देखील या संकेतस्थळाद्वारे खरेदी करण्यासाठी बाजारभावाविषयी खात्रीशीर माहिती मिळवता येते.  

 8. राष्ट्रीय यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञान पोर्टल  पद्धतीची कास धरायला लावणे हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे. www.farmech.dac.gov.in  या वेबसाईटला भेट दिल्यानंतर शेतीत आधुनिकीकरण कसं आणावं याबाबत सर्व माहिती उपलब्ध आहे. कोणत्या पिकासाठी कोणत्या यंत्राचा कसा वापर करावा ते या वेबसाईटवर व्हिडीओसह उपलब्ध आहे. यामुळे आधुनिक पद्धतीने शेती करण्यास मदत होते.

Comments

Popular posts from this blog

आता जमीन घेण्यासाठी मिळणार 100% अनुदान, असा करा अर्ज (karmaveer dadasaheb gaikwad sabalikaran va swabhiman yojana)

ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र --2023 : Tractor Subsidy Scheme

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र