नवीन व्यवसाय करिता बँक ऑफ बडोदा मुद्रा लोन अंतर्गत मिळवा 50 हजार ते 10 लाखांपर्यंत कर्ज | BOB Mudra Loan 2023 

bank of baroda Mudra Loan Yojana in Marathi : नमस्कार मित्रांनो, आज या पोस्ट मध्ये आम्ही प्रधानमंत्री बँक ऑफ बडोदा मुद्रा योजना बद्दल माहिती दिली आहे जसे कि प्रधानमंत्री मुद्रा योजना काय आहे, त्याचा लाभ कोण घेऊ शकतो ? मुद्रा योजना साठी लागणारी कागदपत्रे इत्यादी केंद्र सरकारने लघु उद्योग सुरू करणाऱ्यांसाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) सुरू केली आहे. या अंतर्गत लोकांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी थोड्या प्रमाणात कर्ज दिले जाते. ही माहिती शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचावी-

Bank Of Baroda Mudra Loan Yojana In Marathi

पंतप्रधान मुद्रा लोन योजना (मुद्रा योजना महाराष्ट्र) ही ‘सिडबी’ म्हणजेच स्मॉल इंडस्ट्रीस डीव्हलोपमेंट Small Industries Development उपकंपनी आहे. नॉन-कॉर्पोरेट अशा छोट्या व्यवसाय/लघुऊद्योग करणाऱ्या किंवा करू इच्छित असणाऱ्या व्यावसायिकांना वित्तीय सहाय्य करण्याच्या हेतूने पंतप्रधान मुद्रा Loan (कर्ज) योजना सुरू करण्यात आली.

बँक ऑफ बडोदा मुद्रा लोन योजना

छोटे उत्पादन करणारे उद्योग, दुकाने, फळ/भाजी विक्रेते, ट्रक आणि टॅक्सी व्यवसाय करणारे, अन्न सेवा देणारी केंद्रे, दुरुस्ती करून देणारी दुकाने, लघुउद्योग, घरगुती अन्न प्रक्रिया, फेरीवाले आणि अन्य असंख्य छोट्या व्यवसायिकांना (Small Bussiness/MSME) रु. 50 हजार ते 10 लाखांपर्यंत कर्ज प्रोत्साहन देणे व बँकेमार्फत वित्तीय कर्ज मिळवून देणे हे पंतप्रधान मुद्रा लोन योजनेचे उद्दीष्ट आहे. BOB Mudra Loan Online Apply


प्रधानमंत्री मुद्रा योजनेतील कर्जाचे तीन प्रकार / वर्गवारी

1. मुद्रा योजना कर्ज शिशु श्रेणी : शिशू श्रेणीअंर्तगत 50,000 रुपयांचे कर्ज मिळू शकते. त्यावर प्रत्येक महिन्यासाठी 9 टक्का तर वार्षिक 12 टक्के व्याज आकारले जाते. कर्जाचा कालावधी 5 वर्षांपर्यंत असतो.

2. मुद्रा योजना कर्ज किशोर श्रेणी : किशोर श्रेणीत 50,000 रुपयांपासून 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. या श्रेणीत व्याजाचा दर बँक मार्गदर्शक तत्त्वांनुसार निश्‍चित करते. कर्जाचा कालावधी हा कर्जदाराच्या नावलौकिकावर आधारित असतो.

3. मुद्रा योजना तरुण श्रेणी : तरुण श्रेणीअर्तगत 5 लाख रुपयांपासून 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळते. या श्रेणीत व्याजाचा दर बँक मार्गदर्शक तत्त्वांनुसार निश्‍चित करते. कर्जाचा कालावधी कर्जदाराच्या नावलौकिकावर तसेच बँकेच्या धोरणावर आधारित असतो.

बँक ऑफ बडोदा मुद्रा योजना 2023 ठळक मुद्दे:

मुद्रा योजनेअंतर्गत कोणत्याही प्रकारच्या जामिनाची (Witness) आवश्यकता नाही.

मुद्रा योजनेअंतर्गत कोणत्याही प्रकारचे गहाण ठेवावे लागत नाही.

मुद्रा योजनेअंतर्गत स्वत.च्या 10 टक्के भांडवलाची आवश्यकता नसते.

मुद्रा योजना ही फक्त सरकारी बँकेतच असणार आहे.

मुद्रा योजनेअंतर्गत कर्जदाराचे वय 18 वर्षे पूर्ण असले पाहिजे असे नाही.

मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज मागणारा अर्जदार हा कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा.

प्रधानमंत्री मुद्रा योजना कर्ज घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

• मतदान ओळख पत्र, आधार कार्ड, इत्यादी.

• वीज बिल, घर खरेदी पावती.

• अर्जदार जो व्यवसाय करणार आहे किंवा करत आहे त्याचा परवाना व स्थायी पत्ता.

• मागिल सहा महिन्यांचे बँक खात्याचे स्टेटमेंट (उपलब्ध असल्यास).

• विकत घ्यावयाच्या मशीनरी, वस्तूंचे इ. कोटेशन/बांधकामाचे अंदाजपत्रक.

• व्यवसायासाठी लागणारे मटेरियल किंवा यत्रसामुग्री, इत्यादी त्यांचे कोटेशन व बिले.

• अर्जदाराने ज्या व्यापाऱ्याकडून माल घेतला त्याचे पूर्ण नाव व पत्ता.

• अर्जदाराचे फोटो.

बँक ऑफ बडोदा बँकेकडून प्रधानमंत्री मुद्रा लोन कसे मिळवावे

मित्रांनो , बँक ऑफ बडोदा बँकेकडून रु. 50 हजार ते 10 लाखांपर्यंत प्रधानमंत्री मुद्रा लोन मिळवण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन किंवाच ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

BOB म्हणजेच बँक ऑफ बडोदा या बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन या योजनेची सविस्तर माहिती पाहण्यासाठी आधी –
 येथे क्लिक करावे.

बँक ऑफ बडोदा बँकेकडून रु. 50 हजार ते 10 लाखांपर्यंत प्रधानमंत्री मुद्रा लोन मिळवण्यासाठी/ ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ->येथे क्लिक करावे.

BOB Mudra Loan Online Apply : शेतकरी बंधूंनो , बँक ऑफ बडोदा प्रधानमंत्री मुद्रा लोन या योजनेची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी , तुमच्या मनातील शंका , योजनेबाबत काही प्रश्न असतील यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या बँक ऑफ बडोदा या बँकेच्या शाखेला भेट द्यावी तेथील बँक मॅनेजर सोबत या योजनेबाबत सविस्तर चर्चा करावी व त्यांच्या मार्गदर्शनाखाली अचूक अर्ज करून शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा., धन्यवाद!

पंतप्रधान मुद्रा कर्ज योजनेचा टोल फ्री नंबर: महाराष्ट्रासाठी Mudra Loan Toll Free Number Maharashtra -1800- 102-2636 हा आहे. याशिवाय प्रत्येक राज्याचे स्वतंत्र टोल फ्री नंबर Pdf स्वरूपात पाहण्यासाठी -> इथे क्लिक करा. तर, मुद्रा योनजेचा राष्ट्रीय टोल फ्री नंबर 1800- 180-1111 व 1800- 11-0001 हा आहे; धन्यवाद!

Comments

Popular posts from this blog

आता जमीन घेण्यासाठी मिळणार 100% अनुदान, असा करा अर्ज (karmaveer dadasaheb gaikwad sabalikaran va swabhiman yojana)

ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र --2023 : Tractor Subsidy Scheme

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र