आता जमीन घेण्यासाठी मिळणार 100% अनुदान, असा करा अर्ज (karmaveer dadasaheb gaikwad sabalikaran va swabhiman yojana)

 

आता जमीन घेण्यासाठी मिळणार 100% अनुदान, असा करा अर्ज (karmaveer dadasaheb gaikwad sabalikaran va swabhiman yojana)
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण नेहमीच शेतकऱ्यांसाठी शासन राबवत असलेल्या महत्वाच्या योजनांबद्दल माहिती देत असतो ज्याचा फायदा आजपर्यंत भरपूर जननी घेतला आहे, आज सुद्धा आपण महाराष्ट्र शासनाच्या अशाच एका जबरदस्त योजनेविषयी माहिती घेणार आहोत आणि त्या योजनेचे नाव आहे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना.

शेतकरी योजना : भारत हा कृषिप्रधान देश म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. देशातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या केवळ शेतीमध्ये गुंतलेली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच शेती व्यवसायाला चालना देण्यासाठी शासनाकडून विविध योजना सुरू केल्या जातात. केंद्र सरकार आपल्या स्तरावर आणि राज्य सरकार आपल्या स्तरावर योजना राबवते. दरम्यान, आज आपण शेतकऱ्यांच्या हितासाठी महाराष्ट्र सरकारच्या एका योजनेची माहिती घेणार आहोत.
आज आपण ज्या योजनेची माहिती घेणार आहोत, त्या योजनेत शेतकऱ्यांना शेतजमीन खरेदी करण्यासाठी अनुदान देण्याची तरतूद आहे. वास्तविक, जमिनीशिवाय शेती करणे अशक्य आहे. तथापि, प्रत्येकाला जमीन खरेदी करणे परवडणारे नाही. जमिनीच्या वाढत्या किमती पाहता भूमिहीन शेतकऱ्यांची इच्छा असूनही ते जमीन खरेदी करू शकत नाहीत.

काय आहे दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना?

हि योजना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून चालवली जाते, या योजनेमध्ये ज्या लोकांकडे शेती नाही जे आपला उदरनिर्वाह मोलमजुरी करून चालवतात अशा लोकांना उत्पन्नाचे साधन निर्माण करून देण्यासाठी शेतजमीन खरेदी करण्यासाठी १००% अनुदान दिले जाते

कुणाला मिळेल १००% अनुदान माहितीसाठी येथे क्लिक करा

असे मिळते अनुदान karmaveer dadasaheb gaikwad sabalikaran va swabhiman yojana subsidy

पूर्वी या योजनेमध्ये जमीन खरेदी करण्यासाठी ५०% अनुदान व ५०% कर्ज दिले जात होते परंतु आता शासनाने नवीन आदेशानुसार बदल केला असून आता १००% अनुदान दिले जाणार आहे, त्यामुळे आता पूर्ण जमीन अनुदानावर मिळणार आहे

इतकी मिळेल जमीन लाभार्थ्याला २ एकर ओलिताखालील किंवा जमीन जर कोरडवाहू असेल तर प्रत्येक लाभार्थ्याला ४ एकर कोरडवाहू जमीन दिली जाणार आहे, २ एकर ओलिताखालील जमिनीसाठी १६ लाख रुपये तर ४ एकर कोरडवाहू जमिनीसाठी २० लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे karmaveer dadasaheb gaikwad sabalikaran va swabhiman 

आवश्यक कागदपत्रे कोणती?

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

 • आधार कार्ड
 • रेशन कार्ड
 • बँक खाते तपशील
 • रहिवाशी प्रमाणपत्र
 • उत्पन्नाचा दाखला
 • लाभार्थी दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र
 • मोबाईल नंबर
 • ईमेल आयडी
 • पासपोर्ट साईज फोटो
 • लाभार्थी ६० वर्षाच्या आतील असलेला पुरावा
 • मतदान कार्ड
 • अर्जदार भूमिहीन शेतमजूर असल्याचा तहसीलदार यांचा दाखला
 • १०० रुपयाच्या स्टंप वर प्रतिज्ञापत्र
 • अर्जदार अनुसूचित प्रवर्गातील असल्याचे उपविभागीय अधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र

कुणाला मिळणार लाभ ? Dadasaheb gaikwad sabalikaran yojana benefit

राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन शेतमजूर अत्याचार ग्रस्त, विधवा परितक्त्या महिला यांना या योजनेचा प्राधान्याने लाभ दिला जातो.

अर्ज कुठे आणि कसा करावा? Dadasaheb gaikwad sabalikaran yojana registration process

योजनेसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करावं लागतो, अर्ज घेण्यासाठी अर्जदाराला जिल्ह्याच्या ठिकाणी असणाऱ्या समाज कल्याण विभागातील सहायक आयुक्त यांच्याकडून अर्ज घ्यावा लागेल

विहित नमुन्यातील अर्ज संपूर्ण आणि योग्य रित्या भरून त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडून जमा करावं लागेल.

योजनेमधील वेळोवेळी होणारे बदल तसेच आणखी माहितीसाठी तुम्ही शासनाच्या वेबसाईट ला भेट देऊ शकता, वेबसाईट ची लिंक : www. sjsa.maharashtra.gov.in


Comments

Popular posts from this blog

ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र --2023 : Tractor Subsidy Scheme

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र