पानी आणि कैलोरीज....Water and calories

 पानी आणि कैलोरीज....


https://www.maharashtraupdates85.com/
 पानी आणि कैलोरीज....Water and calories

मानवी शरीरात सुमारे 65 टक्के पाणी आहे. शरीरातील पाण्याचे संतुलन राखणे सर्वात महत्वाचे आहे. जेव्हा पाण्याचे प्रमाण एका विशिष्ट पातळीच्या खाली येते तेव्हा माणसाला तहान लागते.

जेवण करण्यापूर्वी पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते : नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन, इम्युनोथेरपीमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी प्यायल्याने शरीरातील अन्नातून शोषलेल्या कॅलरीजचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होते.विशेषत: वृद्धांमध्ये त्याचा परिणाम अधिक दिसून येतो.

2 लिटर पाणी प्यायल्याने 96 कॅलरीज बर्न होतात :

 PubMed.OGV च्या संशोधनानुसार, एका वेळी सुमारे 500 मिली पाणी प्यायल्याने तात्पुरते 24-30 टक्के चयापचय वाढू शकते. दिवसभरात सुमारे 2 लिटर पाणी प्यायल्याने दिवसाला 96 कॅलरीज अतिरिक्त ऊर्जा खर्च होते.

दिवसभरात किती पाणी प्यावे? जेणेकरून शरीरात पाण्याची कमतरता भासणार नाही आणि वारंवार पाणी पिण्याची समस्या नाही. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसातून तीन लिटर पाणी प्यायला हवे, असे म्हटले जाते. शारीरिकदृष्ट्या मागणी असलेले काम करणाऱ्या लोकांना दिवसाला दोन ते अडीच लिटर पाणी लागते. उन्हाळ्यात शरीराला पाण्याची स्वतःहून गरज असते, पण इतर ऋतूंमध्ये जाणीवपूर्वक पाणी प्यावे लागते. आठ ग्लास पाण्यामागे नेमके गणित काय आहे?आपण शोधून काढू या. आपल्यापैकी बहुतेकांनी ऐकले असेल की दिवसातून आठ ग्लास पाणी पिणे चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. पण सामान्य वातावरणात राहणाऱ्या माणसाला तहान लागेल तेवढेच पाणी प्यावे. काही लोकांच्या शरीराला तहान लागण्यापेक्षा जास्त पाणी पिण्याची गरज असते. कारण व्यक्तीच्या शरीराच्या रचनेनुसार पाणी पिण्याची गरज वेगळी असते. कारण आरोग्याशी संबंधित इतर घटकही त्यावर अवलंबून असतात.

                 सध्याच्या अतिशय तानतनावणाव असलेल्या जीवनात एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी आणि कॅलरीज यांचा परस्पर संबंध त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ. ज्या प्रकारे गाडी चालवण्यासाठी इंधन गरजेचं असतं त्याप्रमाणेच आपल्या शरीराची गाडी योग्य चालण्यासाठी कॅलरीजची आवश्यकता त्यामुळे आपल्या आहारातून शरीरात योग्य प्रमाणात कॅलरीज जाणं महत्त्वाचं आहे. प्रथिनं, चरबी आणि कार्बोदके या तीन पोषक घटकांद्वारे शरीराला कॅलरीज मिळतात. एक ग्रॅम प्रथिन, चरबी आणि कर्बोदकात अनुक्रमे चार आणि चार कॅलरीज असतात, याउलट पाणी हे असं पेय आहे ज्यात कर्बोदकं, चरबी आणि प्रथिनं यांचं प्रमाण शून्य असतं. पाण्याचे असंख्य फायदे तुम्हाला ज्ञात असतील ज्यात आणखी एक शून्य कॅलरी हा एक अत्यंत महत्त्वाचा फायदासुद्धा समाविष्ट करायला काहीच हरकत नाही. पाण्यात कॅलरीचं प्रमाण जरी शून्य असलं तरी त्याचा असा अर्थ अजिबात होत नाही की पाणी तुमच्या शरीराला ऊर्जा देत नाही, याउलट पाणी हे शरीरात गेलेल्या अन्नामधून जी ऊर्जा तयार होते ती सर्व पेशींपर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम करतं.

                पाण्यात कॅलरीज जरी नसल्या तरी पाणी हे आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवापर्यंत ऊर्जा पोहोचवण्याचं काम नक्कीच करतं, एवढंच नाही तर पाणी हे कॅलरीजचं विघटन करण्यासाठी आणि नष्ट करण्यातही खूप महत्त्वाची भूमिका बजावतं. म्हणून वजन कमी करत असणाऱ्या व्यक्तींना भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. थंड पाण्याच्या सेवनाने शरीरातील अतिरिक्त कॅलरीचं विघटन तुलनेनं जलद गतीनं होतं; कॅलरीजच्या विघटनासोबतच पाण्यामुळे शरीराला नको ला कचरा तसंच मूत्रपिंडातील टॉक्सिन्स शरीराबाहेर टाकण्यास मदत होते. तसंच मूत्रपिंड स्वच्छ करण्यासाठीही पाणी उपयोगी पडतं. सोबतच शरीरातील अतिरिक्त चरबीचा साठा जाळण्यासाठीही पाणी मदत करतं, अशाप्रकारे पाणी स्वत मध्ये कॅलरी नसूनही शरीराला इतर स्रोतांमार्फत प्राप्त झालेल्या कॅलरीजना नष्ट करण्यास मदत करतं. शून्य कॅलरी म्हणजे वजनात शून्य वाढ हे ध्यानात घेऊन तुम्ही जर काटेकोरपणे डाएट पाळत असाल तर आजच पाण्यासोबत घट्ट मैत्री करा. यामुळे तुम्हाला तुमच्या कॅलरीज मोजण्याचीसुद्धा गरज भासणार नाही. पाणी हे खरंच एक प्रकारची जादू आहे, असं म्हणायला हरकत नाही. कारण शून्य कॅलरीजचं प्रमाण असणारं हे पाणी शरीराला भरपूर फायदेदेखील देतं.

                  त्यामुळे आजपासूनच दिवसभरात अनेक फायद्यांनी परिपूर्ण असं आठ ग्लास पाणी जरूर प्या. जर आपल्याला किडनी संदर्भातील समस्या नसेल तर, आजच्या या माहितीवरून तुम्हाला कशाच्या अतिरिक्त सेवनानं देखील कॅलरीज वाढू शकत नाहीत याचं उत्तर नक्कीच मिळालं असेल.

Comments

Popular posts from this blog

आता जमीन घेण्यासाठी मिळणार 100% अनुदान, असा करा अर्ज (karmaveer dadasaheb gaikwad sabalikaran va swabhiman yojana)

ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र --2023 : Tractor Subsidy Scheme

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र