10 लाख लोकांचे रेशन धान्य होणार बंद, लवकर करून द्या हे एक काम( Ration card cancellation maharashtra 2023)

 

10 लाख लोकांचे रेशन धान्य होणार बंद, लवकर करून द्या हे एक काम | Ration card cancellation maharashtra 2023


Ration card cancellation maharashtra 2023: मित्रांनो सरकार 10 लाख लोकांचे रेशन कार्ड रद्द करणार असून ह्या लोकांना शासनामार्फत दिले जाणारे मोफत धान्य मिळणार नाही. बरेच लोक स्वतःचे उत्पन्न वाढून देखील शासनामार्फत रेशन धान्य घेत होते. अशा सर्व व्यक्तींकरिता एक महत्त्वाचा नियम शासनाने काढलेला आहे. तो नियम लागू केल्यानंतर बऱ्याच रेशन कार्ड धारकांचे रेशन बंद होणार आहे. तर मित्रांनो आपण या नियमांमध्ये बसत आहोत की नाही, शासनाने दिलेले पुढील रेशन आपल्याला मिळणार आहे की नाही. याबाबत आज आपण सविस्तर माहिती घेऊया.

Ration card cancellation maharashtra:  रेशन कार्ड योजनेबाबत प्रत्येक तहसील ऑफिस मध्ये सविस्तरपणे नोटीस लावण्यात आले आहे. यासोबतच रेशन कार्डधारकांना आवाहन देखील करण्यात आले आहे. हे आवाहन अंत्योदय यासोबतच प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थी यांना करण्यात आले आहे. ज्या नागरिकांचे उत्पन्न हे जास्त आहे. अशा सर्व नागरिकांनी स्वइच्छेने शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या अन्नधान्याच्या पुरवठ्यापासून बाहेर पडावे. म्हणजेच अन्नधान्य पुरवठा योजनेचा लाभ त्यांनी घेऊ नये. शासनाने जास्त उत्पन्न असलेल्या नागरिकांना रेशन कार्ड योजनेचा लाभ घेऊ नये असे सांगितले आहे व अशा नागरिकांनी धान्याचा लाभ सोडणे याचा एक अर्ज आहे. तो अर्ज व्यवस्थितपणे भरून रेशन कार्ड दुकानदार आहे त्याच्याकडे जमा करावा किंवा हा अर्ज परिमंडळ कार्यालयाकडे जमा केला तरी चालेल.

मित्रांनो जर तुम्ही फॉर्म सबमिट नाही केला, तर लवकरच शासनामार्फत पडताळणी सुरू होणार आहे आणि ही पडताळणी तलाठी यांच्यामार्फत होईल. या पडताळणीमध्ये उच्च उत्पन्न असणारे नागरिक, यासोबतच ज्यांच्या कुटुंबामध्ये चार चाकी वाहन आहे, त्यासोबतच एअर कंडिशनर असतील यानंतर मित्रांनो शासकीय किंवा खाजगी नोकरदार वर्ग असतील, याशिवाय एखाद्या व्यक्तीस शासकीय पेन्शन चालू असेल अशा नागरिकांना रेशन कार्ड मार्फत मिळणारे अन्नधान्य पुरवठ्याचा लाभ घेता येणार नाही. तर मित्रांनो कुटुंबातील सर्व सदस्यांची एकूण मिळून उत्पन्न हे 60000 रुपयांपेक्षा जास्त असेल आणि असे असताना देखील एखाद्या व्यक्तीने आतापर्यंत या योजनेचा लाभ घेऊन अन्नधान्य घेतले असेल तर शासनाचे फसवणूक केल्याबद्दल त्यांच्यावरती कार्यवाही देखील केली जाऊ शकते. याशिवाय वसुली देखील केली जाऊ शकते.

अन्नधान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या नागरिकांमध्ये जे कोणी नागरिक शासकीय नोकरदार असतील किंवा निम शासकीय नोकरदार असतील, याशिवाय व्यवसाय, दुकानदार किंवा पेन्शन धारक असतील याशिवाय इतर कोणत्याही कंपनीमध्ये किंवा साखर कारखान्यामध्ये परमनंट काम करणारे असतील. याशिवाय कर भरणारे नागरिक असतील, यासोबतच ज्या कुटुंबीयांकडे घरगुती चार चाकी वाहन असेल किंवा त्यांचा मोठा व्यवसाय असेल अशा नागरिकांनी लवकरात लवकर रेशन कार्ड मार्फत राबवल्या जाणाऱ्या अन्नधान्य योजनेतून बाहेर पडावे.

जर तुम्ही वेळोवेळी बाहेर नाही पडला तर तुमच्या वरती कार्यवाही केली जाऊ शकते किंवा आतापर्यंत तुम्ही घेतलेल्या रेशन अन्नधान्याचे तुमच्याकडून वसुली देखील केली जाऊ शकते. त्यामुळे वरील घटकांमध्ये बसणारे नागरिक यांनी या योजनेचा लाभ घेऊ नये व रेशन दुकानदाराकडे अर्ज सबमिट करावा.

मित्रांनो अजूनही तुम्ही तो फॉर्म (Ration card cancellation form) भरून अर्ज सबमिट करू शकता. जर असे नाही केले तर तुमच्यावरती शासनामार्फत कार्यवाही करण्यात येईल किंवा तुम्हाला त्या ठिकाणी मोठा दंड भरावा लागेल.Comments

Popular posts from this blog

आता जमीन घेण्यासाठी मिळणार 100% अनुदान, असा करा अर्ज (karmaveer dadasaheb gaikwad sabalikaran va swabhiman yojana)

ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र --2023 : Tractor Subsidy Scheme

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र